गर्लफ्रेंडच्या बिझनेस आयडियाने बॉयफ्रेंड मालामाल; अवघ्या पाच दिवसांत कमावले 40 हजार रुपये

गर्लफ्रेंडच्या बिझनेस आयडियाने बॉयफ्रेंड मालामाल; अवघ्या पाच दिवसांत कमावले 40 हजार रुपये

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. या ठिकाणी छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांना कमाई करण्याची संधी आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार तरुण या ठिकाणी आले आहेत. ते आपली शक्कल लढवून कमाई करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु एका बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडच्या आयडियाने मोठा फायदा मिळवून दिला आहे.

गर्लफ्रेंडचे ऐकून बॉयफ्रेंडने सुरू केलेल्या छोटय़ा व्यवसायामुळे त्याला अवघ्या पाच दिवसांत 40 हजार रुपये मिळाले आहेत. त्रिवेणी संगम किनारी सकाळी लोकांना दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काडय़ा विकण्याचा बिझनेस या तरुणाने सुरू केला आहे. कडुलिंबाच्या काडय़ा विकण्याचा त्याचा पाचवा दिवस आहे. त्याने अवघ्या पाच दिवसांत 30 ते 40 हजार रुपयांची कमाई केली आहे. महाकुंभमेळ्यात 9 ते 10 हजार माल विकला जात आहे, असे या तरुणाचे म्हणणे आहे. तुम्ही जितकी जास्त मेहनत घ्याल, तितका तुम्हाला फायदा होईल, असेही या तरुणाने म्हटले आहे.

एक रुपयाचीही गुंतवणूक नाही

गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून या तरुणाने महाकुंभमध्ये हा नवा धंदा सुरू केला आहे. महाकुंभमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यांना रोज सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या काडय़ा हव्या आहेत. या कामासाठी एक पैसाही गुंतवणूक केली नाही. कडुलिंबाच्या झाडापासून फुकट काडय़ा तोडून आणायच्या आणि महाकुंभमेळ्यात विकायचे. यातून चांगली कमाई होत आहे. माझ्या गर्लफ्रेंडवर मी खूप प्रेम करतो. तिच्या आयडियामुळे मी आज चांगले पैसे कमावत आहे, असे या तरुणाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;