शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शाखाप्रमुख इंद्रजित गवस यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये 230 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना आणि शीव येथील श्री गणेश सेवा मंडळ यांच्या वतीने वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी  विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, विभाग संघटक पद्मावती शिंदे,  उपविभाग प्रमुख दत्ता भोसले, शाखाप्रमुख विनोद मोरे, संजय कदम, शाखासंघटक जयश्री रामाने, उपशाखाप्रमुख सचिन साठे, शिवसैनिक प्रशांत भिसे, संजय कांबळे बापेरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पालिका एफ/ उत्तर विभाग यांनी सहकार्य केले.

उपविधानसभा चिटणीस प्रणित खडपे आणि शाखा क्र. 193-194 परिवाराच्या वतीने ‘एन. ए. बी. वर्कशॉप फॉर ब्लाईंड’ संस्थेच्या नेत्रहीन आणि दिव्यांग मुलांना अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार महेश सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई तसेच शिवसेनेचे उपसचिव व शिव अवजड वाहतूक चालक सेनेचे प्रमुख सल्लागार प्रवीण महाले  यांच्या मार्गदर्शनानुसार शिव अवजड वाहतूक चालक सेना महाराष्ट्र अध्यक्ष संदीप (बाबू ) मोरे यांच्या वतीने 99 वाहनचालकांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला. यावेळी विनायक मुरुडकर, संदेश शिरसाटदेखील उपस्थित होते.

शिवसेना उपनेते, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जय भवानी प्रतिष्ठान व शिवसेना शाखा क्र 215च्या वतीने ताडदेव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे,  सुरेखा परब, युगंधरा साळेकर, सुजित राणे, सुरेखा उबाळे, शोभा जगताप यांनी सदिच्छा भेट दिली.  कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, शाखा संघटक सुप्रिया शेंडेकर, युवासेना युवा उपसचिव/अधिकारी हेमंत दुधवडकर यांनी केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;