जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांत स्पेशल वॉर्ड

जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांत स्पेशल वॉर्ड

गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. तशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुण्यात 111 रुग्ण

पुण्यात सध्या जीबीएसचे 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35 हजार घरे आणि 94 हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जात आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप जीबीएसमुळेच झाला याची अजून पुष्टी झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;