सुरक्षेसाठी गुगलचे आयडेंटिटी चेक फीचर; चोरांना पासवर्ड माहीत असूनही फोन वापरता येणार नाही…

सुरक्षेसाठी गुगलचे आयडेंटिटी चेक फीचर; चोरांना पासवर्ड माहीत असूनही फोन वापरता येणार नाही…

सध्याच्या जमान्यात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा गरजेचा भाग बनला आहे. स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंगसाठी नव्हे तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्टोर करण्यासाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी होतो. स्मार्टफोन जर हरवला तर खासगी डेटा आणि बँकिंग इन्फॉर्मेशनचा गैरवापर केला जाण्याची भीती असते. ही भीती दूर करण्यासाठी गुगलने आता नवीन सिक्योरिटी फीचर आणले आहे.

काही दिवसांपूर्वी गुगलने अँटी थेफ्ट फीचर लाँच केले होते. या फीचरअंतर्गत जर कुणी तुमचा फोन खेचला तर तो त्वरित लॉक करणे शक्य होते. त्यामुळे चोर लॉक झालेला फोन अॅक्सेस करू शकणार नाही. हे फीचर खूप उपयुक्त असले तरी चोराला जर तुमचा पासवर्ड किंवा पिन माहिती असेल तर मोठे नुकसान होऊ शकते. यावर तोडगा म्हणून गुगलने नवीन फीचर आणलंय. या फीचरचे नाव आयडेंटिटी चेक असे आहे. या फीचरमुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये अजून एक सिक्योरिटी अपडेट मिळते. आयडेंटिटी चेक हे फीचर नावाप्रमाणे युजरची आयडेंटिटी चेक करेल. म्हणजे तुमच्या फोनमधील डेटा अॅक्सेस करण्यासाठी तुम्हीच फोन वापरत असल्याची खात्री करून घेईल. त्यासाठी फिंगरप्रिंट व फेस रेकग्नेशन असा बायोमॅट्रिक डेटा तपासला जाईल.

गुगलच्या नवीन आयडेंटिटी चेक फीचरमध्ये तुम्ही काही सेफ लोकेशनदेखील जोडू शकता. जर एखाद्या लोकेशनपासून फोन दूर गेल्यास फोन आयडेंटिटी चेक मागेल. जर तुम्ही सेफ लोकेशन्सवर असाल तर तुम्हाला सहज डेटा अॅक्सेस करता येईल.

गुगलच्या फीचरमुळे लाखो अॅंड्रॉईड युसर्जला दिलासा मिळेल. आयडेंटीटी चेक फीचर ऑन असताना बायोमेट्रीक
ऑथेंटीकेशनशिवाय डिव्हाईसचा पिनकोड कुणाला बदलता येणार नाही. सिक्युरिटी फीचर बंद करू शकत नाही. हे फीचर केवळ अल्ट्रासोनिक किंवा ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि थ्रीडी फेस रेकग्निशन असलेल्या डिव्हाइसला समर्थन देईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;