Maha Kumbh Stampede- प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, अमृतस्नान रद्द

Maha Kumbh Stampede- प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, अमृतस्नान रद्द

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एबीपी माझाच्या वृत्तात दिली आहे. तसेच अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, जखमी लोकांच्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र या घटनेत किमान 30 ते 40 भाविक जखमी झाल्याची माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

सोशल मीडिया वरून सतत वेगवेगळे इन्फ्लुएंसर हे संगम घाटावरील स्नानाचे कसे महत्त्व आहे हे सांगत होते. त्यामुळे विविध ठिकाणी शाही स्नानाची व्यवस्था केलेली असताना देखील अनेकांचा ओढा हा प्रमुख मानला जाणाऱ्या संगम घाटाकडे होता. यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक संगम घाटावर जाण्यासाठीच आग्रही होते. त्यामुळे संगम घाट कडे जाणारा रस्ता प्रचंड भरून गेला, अशी माहिती मिळते आहे.

याउलट आता अनेक आध्यात्मिक गुरु पुढे येऊन भाविकांना आवाहन करत आहेत की केवळ संगम घाटावर स्नानाला जाण्याचा आग्रह धरू नका. प्रयागराज मध्ये जे विविध घाट तयार करण्यात आले आहेत तिथे देखील स्नान केल्यानंतर तेवढेच पुण्य मिळेल आणि गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. मात्र लोकांचा ओढा हा संगम घाटाकडेच असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच ही प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरी झाल्याचं कळतं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;