एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका, पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका, पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

एफआयआरमध्ये मराठी भाषेच्या अक्षम्य चुका असल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. याबाबत पोलीस उप निरीक्षकावर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने डीसीपींना दिले आहेत.

आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अनिल देवरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकल पीठाने डीसीपी परिमंडळ-6 यांना दिले आहेत. गुह्याचा तपशीलही चुकीचा नोंदवला गेला आहे. या एफआयआरची प्रत डीसीपी परिमंडळ-6 यांना पाठवून द्यावी. जेणेकरुन त्यांना योग्य ती कारवाई करता येईल, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.  विनयभंगाच्या गुन्हय़ात सत्र न्यायालयाने दिलेले  अटकेपासून संरक्षण रद्द करण्यात आले. त्या विरोधात जाईद अंसारीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर एकल पीठापुढे सुनावणी झाली.

अशा आहेत चुका

वर्शापासून, षिवाजीनगर, षिफासोनी व लोखंडी रॉंड असे चुकीचे शब्द गुन्हा नोंदवताना नमूद करण्यात आले. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या एफआयआरचा मसुदा स्वतः पोलीस उप निरीक्षक देवरे यांनी तयार केला व  त्यांनीच तो टाईप केला, असेही न्यायालयाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;