सैफवर हल्ला करणारा शरीफुलच!पोलिसांना फिंगर प्रिंट अहवालाची प्रतीक्षा

सैफवर हल्ला करणारा शरीफुलच!पोलिसांना फिंगर प्रिंट अहवालाची प्रतीक्षा

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लामच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्याविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. हाताच्या ठशाबाबत फिंगर प्रिंट विभागाकडून अहवाल प्राप्त झाला नसल्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी आज स्पष्ट केले.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लामला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. मोहम्मद शरीफुलच्या अटकेनंतर अनेक नाटय़मय घटना घडत होत्या. मोहम्मद शरीफुलच्या अटकेपूर्वी त्याच्या चेहऱयाशी साम्य असणाऱया तिघांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले होते. शरीफुल इस्लामच्या अटकेनंतर त्याच्या वडिलांनीदेखील तो आपला मुलगा नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळाहून आणि जप्त केलेल्या चाकूच्या तुकडय़ावरून पोलिसांनी काही हाताचे ठसे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्याचे ते ठसे मोहम्मद शरीफुल इस्लामचे नसल्याच्या वृत्ताने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाकडून माहिती दिली जात नसल्याचे शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून खुलासा केला.

मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असल्याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत. तो बांगलादेश येथून हिंदुस्थानात येण्यापूर्वी तो कोलकाता येथे राहिला होता. तेथे त्याला कोणी मदत केली होती, त्या सर्वांचे पोलिसांनी जबाब नोंद केले आहेत. जबाब नोंद करण्यासाठी पोलिसांचे पथक नुकतेच कोलकाता येथे होते. आरोपीला अटक करताना स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेने चांगले काम केले.

फिंगर प्रिंट अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही

मोहम्मद शरीफुलचा फिंगर प्रिंट अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे काहीच निष्पन्न झाले नाही. त्या पहाटे 2 वाजून 47 मिनिटांनी अभिनेता सैफ अली खान हा रुग्णालयात पोहचला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असल्याचे दहिया यांनी स्पष्ट केले. तसेच चाकूहल्ल्याची माहिती लीलावती रुग्णालयातून प्राप्त झाली असून ती माहिती सैफ अली खान याच्या कुटुंबीयांकडून मिळाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच मोहम्मद शरीफुलच्या चेहऱयाची चाचणीबाबत संशय व्यक्त केला जात होता. लवकरच मोहम्मद शरीफुलच्या चेहऱयाची ओळख पटवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;