तोकडे कपडे घातल्यास सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशबंदी

तोकडे कपडे घातल्यास सिद्धिविनायक मंदिरात प्रवेशबंदी

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भक्तांसाठी आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येणाऱया भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती आज श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मुंबईसह देशाच्या कानाकोपऱयातून भाविक येतात. माघी गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने ड्रेसकोडबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांनी शालिनता जपणारा व मंदिराचे पावित्र्य राखले जाईल असा पेहराव करून दर्शनासाठी यावे. जो पेहराव कराल तो दुसऱयाला संकोच वाटणारा नसावा,असे ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रसादासाठी आता कागदी पाऊच

श्री सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक पाऊच बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक कागदी पाऊचचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णयदेखील ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.

– फाटकी जिन्स, स्कर्ट अथवा अंगप्रदर्शन करणारे ड्रेस परिधान केल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;