कमळाबाईवर देणगीदार मेहरबान, वर्षभरात 3967 कोटींच्या देणग्या

कमळाबाईवर देणगीदार मेहरबान, वर्षभरात 3967 कोटींच्या देणग्या

कमळाबाईवर देणगीदार मेहरबान असल्याचे दिसत असून भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीआधी वर्षभरात तब्बल 3,967.14 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे उघड झाले आहे. निवडणूक रोख्यांमधून पक्षाला या देणग्या मिळाल्या असून देणग्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 87 टक्क्यांची वाढ झाली आहे. भाजपाच्या 2023-24 च्या ऑडिट रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने आज विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. भारतीय जनता पक्षाला 2022-23 मध्ये 2,120.06 कोटी रुपये देणगी मिळाली होती. तर 2023-24 मध्ये हाच आकडा 3,967.14 कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 1685.62 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही रक्कम एकूण देणगीच्या 43 टक्के आहे. तर 2022-23 मध्ये पक्षाला निवडणूक रोख्यांमधून 1294.14 कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम एकूण देणगीच्या 61 टक्के होती.

काँग्रेसच्या देणग्यांमध्ये निवडणूक रोख्यांचे प्रमाण 73 टक्के

काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 828.36 कोटी रुपये मिळाले. काँग्रेसला मिळालेल्या एकूण देणग्यांमध्ये निवडणूक रोख्यांचे प्रमाण 73 टक्के आहे. 2022-23 मध्ये हाच आकडा 171.02 कोटी रुपये होता. काँग्रेसचा निवडणूक खर्च 192.55 कोटी रुपयांवरून 619.67 कोटी रुपयांवर पोहोचला.

जाहिरातीवर 1,754 कोटींचा खर्च

लोकसभा निवडणूक झालेल्या वर्षात भाजपाने प्रचारावर तब्बल 1,754 कोटी रुपये खर्च केले. त्याआधीच्या वर्षात भाजपचा खर्च 1,092.15 कोटी रुपये इतका होता. भाजपाने जाहिरात आणि प्रचारावर 591.39 कोटी रुपये खर्च केले. दरम्यान, भाजपनंतर काँग्रेस दुसऱया क्रमांकावर आहे. निवडणूक वर्षात काँग्रेसला मिळालेली देणगी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 2022-23 मध्ये पक्षाला 268.62 कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले. 2023-24 मध्ये हाच आकडा तब्बल 320 टक्क्यांनी वाढला. तो 1 हजार 129.66 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;