Solapur News – अकरा वाळू माफिया जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार, पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई

Solapur News – अकरा वाळू माफिया जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार, पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई

पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरी करणाऱ्या अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ही धडक कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी वाळू संबंधात अधिक गुन्हे करणाऱ्या 11 जणांचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार कारवाई करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये अनिल लक्ष्मण पवार, कृष्णकांत दत्तात्रय पळसे, सचिन चांगदेव काटे, सुधीर ऊर्फ बापू संभाजी कांबळे, पंकज रामदास घाडगे, सुनील नाथ देठे, रवी ऊर्फ सूरज शंकर आटकळे, विक्रम हनुमंत चोंडे, सागर प्रकाश साळुंखे, सचिन तुकाराम भोई, मारुती दगडू बोंबाळे असे एकूण 11 जणांचे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1)(अ )(ब ) प्रमाणे दोन वर्ष हद्दपारीचे प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी प्रस्ताव मंजूर केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे, पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर आणि पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;