पाकिस्तानी अभिनेत्याचं भारतीयांकडूनही कौतुक; पाकिस्तानी शोमध्ये म्हटली सरस्वती वंदना, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानी अभिनेत्याचं भारतीयांकडूनही कौतुक; पाकिस्तानी शोमध्ये म्हटली सरस्वती वंदना, व्हिडीओ व्हायरल

अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे, अनेक सेलिब्रिटींनी लोकप्रियता मिळवली असून चाहता वर्ग भारतातही फार मोठ्या प्रमाणावर होता. मात्र 2016 मध्ये उरी येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील विविध कलाकार आणि चित्रपट संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्यास बंदी घातली होती.

तेव्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूमध्ये काम दिलं जात नाही. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधरत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही असं ठरवलं होतं. ते्व्हापासून पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये जास्त काम मिळत नाहीये.

पाकिस्तानी अभिनेता सध्या चर्चेत 

मात्र असा एक पाकिस्तानी अभिनेता आहे ज्याचं कौतुक आज भारतीयसुद्धा करत आहे. हा पाकिस्तानी अभिनेता सध्या चर्चेत आहे. कारण या अभिनेत्याने चक्क संस्कृतमध्ये सरस्वती वंदना म्हटली आहे. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

या अभिनेत्याचे नाव आहे अली खान. अली खान पाकिस्तानी अभिनेता असून त्याने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. अली खान याने पाकिस्तानी शोमध्ये अस्खलित संस्कृतमध्ये “सरस्वती वंदना” गायली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्यानं अस्खलित संस्कृतमधून “सरस्वती वंदना” म्हटली

अली खानने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अली खाननं त्याला उर्दू, हिंदी आणि संस्कृत या तिन्ही भाषेचं ज्ञान असल्याचं सांगितलं. यानंतर त्याला संस्कृतमधून काहीतरी बोलण्यास सांगितले. तेव्हा त्याने चक्क अस्खलित संस्कृतमधून “सरस्वती वंदना” म्हणून दाखवली. यावेळी तो शेवटचे काही शब्द विसरला. पण तरीही त्याचे उच्चार आणि चोख पाठांतर बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by 365 News (@365.newspk)

 नेटकऱ्यांकडून अली खानचं कौतुक 

एक पाकिस्तानी अभिनेता संस्कृत बोलतोय, हे पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. मुख्य म्हणजे भारतीयांनी या कलाकाराचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

अली खानने काजोलसोबत ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. याशिवाय त्याने ‘लक बाय चान्स’, ‘डॉन २’ आणि ‘द आर्चीज’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. दरम्यान हा अलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. पाकिस्तानी अभिनेता असूनही त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय प्रेक्षकांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;