मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती द्या; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती द्या; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

राजधानी दिल्लीत वाढते प्रदूषण हा विषय नेहमी ऐरणीवर असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतही प्रदूषण वाढत आहे. तसेच हवेची गुणवत्ता ढासळत आहे. राज्यात हवेचा दर्जा खालावत असून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकार काय करत आहे किंवा काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत, याची कोणतीही माहिती मिळत नाही. मुंबईकरांना काहीही दोष नसताना त्यांना प्रदूषित वातावरणात का राहवे लागत आहे. मुंबईकरांनी हा त्रास का सहन करावा ?असा सवालही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती द्यावी, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबईवर पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरली आहे. तसेच हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. मुंबईकरांची या वायूप्रदूषणातून आणि ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेतून वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून केलेल्या कृतींबद्दल काहीही सांगितले जात नाही. आम्ही बनवलेला मुंबई हवामान कृती आराखडा राज्य सरकारने अंमलात आणण्याची मागणीही त्यांनी केली. प्रदूषण रोखण्यासाठी वाढत्या बांधकामांबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. मुंबईत वाढत्या बांधकामांमुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी खोकला, घशाची जळजळ, श्वसनासह अनेक आजारांचा समाना करावा लागत आहे. सरकारने मुंबईकरांना माहिती दिली पाहिजे की, मुंबईकरांना या प्रूदूषित हवेचा सामना का करावा लागत आहे, असेही आदित्य यांनी सरकारला ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;