Latur News – सोयाबीन खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांची वाहनासंह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Latur News – सोयाबीन खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांची वाहनासंह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लातूर येथील बाजार समितीमध्ये सुरू असलेले नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र अचानक बंद करण्यात आले. या संदर्भात काहीच योग्य माहिती देण्यात येत नसल्याने वैतागून शेतकरी वाहनांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन साठी नोंदणी केलेली होती. शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन येण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन केंद्रावर वाहनांसह रांगा लावल्या होत्या. आठ दिवसापासून शेतकरी सोयाबीन खरेदी केंद्रावर आपले सोयाबीन जाईल, या उद्देशाने तग धरून बसले होते. आज अचानक खरेदी केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट वाहनासह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदीची मर्यादा वाढवण्यात आल्याचे पत्र दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;