Arts Festival 2025 – सायन कोळीवाड्यातील गुरू नानक महाविद्यालयात “कला उत्सवची” धूम

Arts Festival 2025 – सायन कोळीवाड्यातील गुरू नानक महाविद्यालयात “कला उत्सवची” धूम

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नॅक मुल्यांकित A + श्रेणी असणाऱ्या सायन कोळीवाड्यातील स्वायत गुरू नानक महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स कमिटीच्या नेतृत्वाखाली ‘कला उत्सव 2025’ हा सोहळा 600 हून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात गायन, नृत्य व फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. 70 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात आपली कला महाविद्यालयाच्या सभागृहात सादर केली.

“विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करणं ही शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे. शिक्षक म्हणून समाजात वावरत असताना विद्यार्थांना एक चांगला माणूस बनवणं हे आपल्या केवळ शिक्षकांच्या हातात आहे. त्यासाठी विविध व्यासपीठ आम्ही विद्यार्थांना नेहमीच देत असतो त्यांच्या यशातच आमचं समाधान दडलेलं आहे.” असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया यांनी केले. या इंट्रा कॉलेजिएट स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अतुल पडवळ (गायन स्पर्धा), सिद्धार्थ माळकर (नृत्य स्पर्धा) व रोहन जोशी (फॅशन शो स्पर्धा) यांनी धुरा सांभाळली. प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.सी चे अध्यक्ष प्रा. संगम शंकर कोळी यांनी व त्यांच्या टीमने कला उत्सव यशस्वीरीत्या पार पाडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;