जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, टीम इंडियाच्या कोणत्याच वेगवान गोलंदाजाने केला नाही असा विक्रम

जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, टीम इंडियाच्या कोणत्याच वेगवान गोलंदाजाने केला नाही असा विक्रम

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. 2024 या वर्षात जसप्रीतने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळेच आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जसप्रीत बुमराहची ICC Men’s Cricketer Of The Year म्हणून घोषणा केली आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार पटकावणारा जसप्रीत बुमराह पहिला हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये इंग्लंडचा हॅरी ब्रुक, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि इंग्लंडच्या जो रुट या मातब्बर खेळाडूंचा समावेश होता. जसप्रीत बुमराहने या सर्वांना धोबीपछाड देत पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. सध्या जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह 20 पेक्षा कमी सरासरीने वेगवान 200 विकेटचा टप्पा पार करण्याची किमया त्याने साधली आहे. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार यापूर्वी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्वन आणि विराट कोहलीने (2 वेळा) पटकावला आहे. परंतु या सर्वांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;