हिंदुस्थानी मच्छिमारांवर श्रीलंकेच्या नौदलाचा गोळीबार, 5 जखमी; हिंदुस्थानने तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी

हिंदुस्थानी मच्छिमारांवर श्रीलंकेच्या नौदलाचा गोळीबार, 5 जखमी;  हिंदुस्थानने तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी

डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात मंगळवारी 5 हिंदुस्थानी मच्छिमार जखमी झाले आहेत. यातील दोन मच्छिमारांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेनंतर  हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत श्रीलंकेकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हिंदुस्थानने श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना बोलावून घेत याबाबत निषेध नोंदवला. तसेच कोलंबो येथील हिंदुस्थानचे उच्चायुक्त हे श्रीलंकेच्या परराष्ट्र विभागाशी संवाद साधून हा विषय लावून धरणार असल्याचे सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटावर 13 हिंदुस्थानी मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाकडून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. मासेमारी करणाऱ्या बोटीवर 13 जण होते, त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जाफना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, अन्य तीन मच्छिमारांनाही किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जाफना येथील जखमी मच्छिमारांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिवाय त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर यांच्या कुटुंबियांना शक्य तेवढी मदत केली. पराराष्ट्र विभागाने नवी दिल्लीत बेटावरील उच्चायुक्तांना मंगळवारी सकाळी बोलावले आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यासोबतच, कोलंबोमधील हिंदुस्थानच्या उच्चायुक्तालयानेही श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हिंदुस्थान सरकारने कायम मच्छिमारांच्या समस्या माणूसकीने हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समस्या लक्षात घेतल्या. कोणत्याही स्थितीत बळाचा वापर योग्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;