देवगडमध्ये गवारेडे थेट पोहचले आरे शाळेच्या परिसरात; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये घबराट

देवगडमध्ये गवारेडे थेट पोहचले आरे शाळेच्या परिसरात; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये घबराट

देवगड तालुक्यात गवारेड्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गवारेड्याच्या कळपाने अनेकदा चारचाकी व दुचाकी वाहनावर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सोमवारी गवारेड्याच्या कळपाने आरे शाळेच्या परिसरात आपला मोर्चा वळविला. अचानक हायस्कूल परिसरात आलेल्या गवारेड्यांच्या कळपामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरे गावचे माजी सरपंच महेश पाटोळे यांनी तात्काळ वन विभागाला फोन करून वनरक्षक राठोड यांना बोलावून घेतले. तात्काळ या गवारेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. गवारेड्यांचा वावर देवगड तालुक्यात खूप वाढला आहे. यापूर्वी गवारेड्यांनी दुचाकी चारचाकी वाहवांवर दिवसाढवळ्या हल्लेही केले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत वनविभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन वनरक्षक राठोड यांना करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;