30 वर्षांच्या प्रियकरासोबत आजी पळाली, बदनामी होऊ नये म्हणून…! मुलाने दिली माहिती

30 वर्षांच्या प्रियकरासोबत आजी पळाली, बदनामी होऊ नये म्हणून…! मुलाने दिली माहिती

प्रेमात अखंड बुडालेल्या तरुण तरुणींचे प्रताप तुम्ही अनेकदा सोशल मीडिया किंवा बातम्यांच्या माध्यमातून पाहिले असतील. परंतु आता चक्क एक आजीच 30 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून त्यांनी बदनामीच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

सदर घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बजारिया भागामध्ये घडली आहे. सदर महिला ही 50 ते 55 वर्षांची असून ती 30 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली आहे. आमची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही या घटनेबद्दल कोणालाच सांगितले नसल्याची माहिती, महिलेच्या मुलाने दिली आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे कुटुंबीयांना समाजात वावरताना तोंड लपवावं लागत असल्याची खंत, कुटुंबीयांनी यावेळी बोलून दाखवली. त्यामुळे कानपूरमध्ये सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. कटुंबीयांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार दाखल झाली तर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;