AB de Villiers चे वादळ पुन्हा एकदा गोंगावणार, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी झाली निवड

AB de Villiers चे वादळ पुन्हा एकदा गोंगावणार, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी झाली निवड

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज, ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्स पुन्हा एकदा गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती जाहीर केली आहे. परंतु तो आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत आपण पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. “हे अधिकृत आहे मी आगामी World Championship Of Legends 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे आपल्या तारखा फिक्स करून ठेवा, स्पर्धा 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. पाच अन्य देशांचे दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये एबी डिव्हिलियर्सच्या नावाचा समावेश केला जातो. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 कसोटी सामन्यांमध्ये 22 शतकांच्या मदतीने 8765 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये 218 सामन्यांमध्ये त्याने 25 शतके ठोकली आहेत. तसेच एकूण 9577 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी20 मध्ये त्याने 78 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 75 डावांमध्ये 10 अर्धशतकांच्या मदतीने 1672 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विविध प्रीमियर लीग्स आणि IPL मध्येही त्याच्या फलंदाजीची जादू चाहत्यांना पहायला मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;