‘लापता लेडिज’चा जपानमध्ये डंका, फिल्म पुरस्कारासाठी पाच आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये मिळवले स्थान

‘लापता लेडिज’चा जपानमध्ये डंका,  फिल्म पुरस्कारासाठी पाच आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये मिळवले स्थान

आमिर खान प्रोडक्शन्स आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’या बहुचर्चित सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांचे मन जिंकले. अगदी छोट्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवरही त्याची क्रेझ कायम दाखवली. आता या सिनेमाने जपानमध्येही आपले वेगळे स्थान निश्चित केले आहे. जपान अॅकेडमी फिल्म प्राईजच्या पाच आतंरराष्ट्रीय सिनेमांमध्ये ‘लापता लेडिज’ ने समावेश केला आहे.

‘लापता लेडिज’हा सिनेमा जपानमध्ये 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा जवळपास 115 दिवसानंतरही तिथे सुरुच आहे. या सिनेमाने टॉप 5 आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये आपले स्थान मिळवल्याने हिंदुस्थानी कथा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली छाप पाडत असल्याचे सिद्ध करु दाखवले.

हा सिनेमा जपानमध्ये प्रदर्शित होऊन 17 आठवडे झाले असून 115 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. हा सिनेमा ‘जपान अॅकेडमी फिल्म प्राईज 2024’ मध्ये प्रदर्शित झाला आणि 204 आंतरराष्ट्रीय सिनेमांमधून पाच आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता साऱ्यांचे लक्ष 14 मार्चवर आहे कारण यादिवशी ‘बेस्ट इंटरनेशनल फिल्म’चा अॅर्वार्ड घोषित केला जाणार आहे. एकापेक्षा एक सरस असलेल्या 204 सिनेमांना मागे टाकत ‘बेस्ट इंटरनेशनल फिल्म’साठी ‘लापता लेडिज’ शॉर्ट लिस्टेड झाला आहे. त्यामुळे सिनेदिग्दर्शक किरण राव हिचे नाव क्रिस्टोफर नोलन, यॉर्गोस लांथिमोस, एलेक्स गारलैंड आणि जोनाथन ग्लेजर यांच्या स्पर्धेत घेतले जात आहे. शिवाय ‘लापता लेडिज’सोबत ‘पुअर थिंग्स’, ‘ऑपेनहाइमर’, ‘द जोन ऑफ इंटरेस्ट’ आणि’सिविल वॉर’ सारखे सिनेमे शर्यतीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;