अजबच! वाघाच्या मूत्राची वाढली मागणी, ‘या’ आजारांवर रामबाण असल्याच्या दाव्याने चीनमध्ये खळबळ

अजबच! वाघाच्या मूत्राची वाढली मागणी, ‘या’ आजारांवर रामबाण असल्याच्या दाव्याने चीनमध्ये खळबळ

चीनच्या अनोख्या खाण्यापिण्याच्या सवयी सर्वांनाच परिचित आहे. मात्र आता तर चीनने कहरच केला आहे. संधिवातासारख्या आजारांवर वाघाचे मूत्र रामबाण असल्याचा दावा केला आहे. आता तर संधीवात बरा करण्यासाठी वाघाच्या मूत्राचा वापर केला जात असून चीनच्या बाजारात वाघाचे मूत्र बाटल्यांमध्ये भरुन बक्कळ किमतीला विकले जात आहे.

नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील प्राणीसंग्रहालय संधिवात उपचार म्हणून वाघाचे मूत्र विकत आहे. ‘याआन बिफेंगक्सिया वन्यजीव प्राणीसंग्रहालय’ असे या प्राणीसंग्रहालयाचे नाव आहे. हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांना सायबेरीयन वाघाचे मूत्र विकून संधिवात आणि स्नायूंच्या दुखण्यावर रामबाण उपाय असल्याचा दावा करत आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, वाघाच्या मूत्राच्या बाटल्या तब्बल 50 युआन म्हणजेच 600 रुपयांना विकल्या जात आहेत. एका बाटलीत अडीचशे ग्रॅम मूत्र असते. संधिवात आणि स्नायूंच्या वेदनेवर हे मूत्र लावण्याबाबत प्राणीसंग्रहालयाकडून काही सूचनाही दिल्या आहेत. स्थायूंना वेदना होत असल्यास वाघाच्या मूत्रात व्हाईट वाईन आणि आल्याचा तुकडा मिक्स करुन त्यावर लावावा. एवढेच नाही तर प्राणीसंग्रहालयाकडून वाघाचे मूत्र प्यायल्यानेही अनेक आजार बरे होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास हे मुत्र पिऊ नये असेही सांगण्यात आले आहे.

प्राणी संग्रहालयाच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाघाने मूत्र केल्यानंतर ते एका भांड्यात एकत्र केले जाते. मात्र ते किटाणूरहीत केले जाते की नाही याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. अनेक आजारांवर वाघाचे मूत्र रामबाण ठरत असल्याच्या बातमीने चीनमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक डॉक्टरांनी याला विरोध केला आहे. अशाप्रकारच्या उपचारांना प्रोत्साहन देणे म्हणजे अनेक धोके निर्माण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;