शेअर बाजार सावरणार की आणखी घसरणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

शेअर बाजार सावरणार की आणखी घसरणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

शेअर बाजार सध्या दबावात दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात मोठी घसरण होत आहे. तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा विक्रीचा सपाटा सुरुच असल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. कोरोना महामारीनंतर शेअर बाजारातील ही मोठी घसरण आहे. त्यामुळे बाजाराची पुढील दिशा काय असेल याबाबत तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात घसरण होती. मात्र, मंगळवारी बाजार थोडा सावरताना दिसत आहे. मुंबई शेअर बाजार 76,453.17 अंकांवर व्यवहार करत आहे. त्यात 1087.00 अंकांची म्हणजेच 1.44 टक्क्यांची वाझ दिसून आली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 23,124.80 व्यवहार करत असून त्यात 295.65 अंकांची म्हणजे 1.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बँक निफ्टीमध्ये 1,148.65 अंकांची म्हणजेच 2.39 टक्क्यांची वाढ झाली असून त्याचा निर्देशांक 49,213.30 अंकांवर व्यवहार करत आहे. मुंबई शेअर बाजार 76 हजार अंकांच्या वर आहे. निफ्टी 23 हजार अंकांच्या वर आहे. तर बँक निफ्टी 49 हजार अंकांच्या वर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर बाजारावर जागतिक घडामोडी आणि डॉलर, सोन्याच्या किंमतीचा परिणाम होत असतो. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक गुतंवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीला प्राधन्य दिले आहे. त्यामुळे ट्रम्प यांची धोरणे आणि परकीय गुंतणूकदारांची भूमिका बाजाराची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर बाजाराविषयी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. फेब्रुवारीमध्ये शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

शेअर बाजारात मंगळवारी थोडीशी खरेदी दिसली त्यामुळे बाजार थोडा सावरताना दिसत आहे. मात्र, अर्थसंकल्पाचा काळ सोडला तर बाजारात घसरणीचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्याबाबत अर्थसंकल्पात काही सकारात्मक निर्णय झाले किंवा काही सकारात्मक संकेत मिळाले तर बाजार काही सावरू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) बँकिंग व्यवस्थेत तरलता वाढविण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्यानंतर बाजारात सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे आणखी सकारात्मक घोषणा झाल्यास बाजार सावरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या सर्वांचा योग्य अभ्यास करत गुंतवणूकदारांनी समंजसपणे गुंतवणूक करावी. किरकोळ गुंतवणुकदारांनी या वेळी फक्त त्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यांचे फंडामेंटल मजबूत आहेत आणि कंपनी नफ्यात आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीबद्दल त्यांना फारशी माहिती नाही, अशा कंपनीत गुंतवणूक करणं टाळावं. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे आणि ही आणखी दिसून येऊ शकते. अशा वेळी विशिष्ट आव्हाने असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं टाळावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;