ही पालकमंत्रीपदाची नाही तर जिल्ह्याचे मालक बनण्याची लढाई, अनिल परब यांचा टोला

ही पालकमंत्रीपदाची नाही तर जिल्ह्याचे मालक बनण्याची लढाई, अनिल परब यांचा टोला

पालकमंत्रीपदावरून सध्या महायुतीत धुसफूस सुरू आहे. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या वाद हिसांचारापर्यंत पोहोचले. अद्यापही या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.

”ही पालकमंत्रीपदाची लढाई नाही मालकमंत्रीपदाची लढाई आहे. हे जिल्ह्याचे पालक नाही मालक बनायला चालले आहेत. एवढं काय आहे त्या पालकमंत्रीपदात ज्यासाठी जिल्ह्यात फिरू देणार नाही इथपर्यंत वाद टोकाला गेला आहे. त्या जिल्ह्यातली मलाई काढून घेण्यासाठी यांना मंत्रीपद हवं आहे. ज्याला विकास करायचा त्याला कोणताही जिल्हा दिला तरी तो त्या जिल्ह्याचा पालक म्हणून विकास करण्यासाठी काम करू शकतो. परंतू हा मालकपदाचा वाद आहे”, असे अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;