नेदरलँड म्युझियमध्ये सिनेस्टाईल चोरी, 2500 वर्ष जुना मुकुट पळवून नेला

नेदरलँड म्युझियमध्ये सिनेस्टाईल चोरी, 2500 वर्ष जुना मुकुट पळवून नेला

नेदरलँडच्या एशेन शहरातील प्रसिद्ध ड्रेंट्स म्युझियममध्ये सिनेमात घडावी अशी चोरीची घटना घडली आहे. इथल्या चोरट्यांनी म्युझियममध्ये सिनेस्टाईल चोरी केली आहे. ऐतिहासिक म्युझिअममधून शेकडो वर्षांपूर्वीचा मौल्यवान मुकुट चोरी केला आहे. ही चोरी शनिवारी सकाळी झाली असल्याची माहिती डच पोलिसांनी दिली आहे.

या चोरट्यांनी आधी स्फोट घडवून म्युझिअममध्ये घुसण्याचा मार्ग बनवला आणि चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजून 45 वाजता एका स्फोटाची माहिती मिळाली होती. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज जारी केल्यानंतर फुटेजमध्ये संशयित स्फोटापूर्वी बाहेरचा दरवाजा उघडताना दिसत आहेत. चोरांनी त्यांच्यासोबत तीन डॅशियन सोन्याच्या बांगड्या आणि कोटोफेनेस्टी काळातील एक भव्य सजवलेले मुकुट पळवून नेले.

हे मुकूट अंदाजे 2500 सालापूर्वी तयार केले होते आणि  ते प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. या सर्व वस्तू डॅशियन लोकांबद्दलच्या प्रदर्शनाचा भाग होत्या, हा एक प्राचीन समाज ज्याने रोमनांनी जिंकण्यापूर्वी सध्याच्या रोमानियाचा बराचसा भाग व्यापला होता.  त्या काळात प्राचीन कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या या संग्रहालयात ‘डेशिया – एम्पायर ऑफ गोल्ड अँड सिल्व्हर’ नावाचे प्रदर्शन सुरू होते. एका संकेतस्थळावर असलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ड्रेंट्स म्युझियमने कोटोफेनेस्टीच्या हेल्मेटचा संदर्भ दिला. हे मुकूट शेकडो वर्षापूर्वी रोमानियन गावात सापडले होते. त्याची रचना पौराणिक आहे. युद्धाच्या वेळी शत्रुपासून संरक्षण मिळण्यासाठी केलेली त्याची रचना आहे.

डच पोलिसांनी जागतिक पोलीस एजन्सी इंटरपोलसोबत काम करत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना 50 हून अधिक सूचना मिळालेल्या आहेत. चोरीच्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.  तपासकर्ते सध्या एका संशयास्पद वाहनाचीही तपासणी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;