बाबा, मला माफ करा… माझी बायको मला मारते आणि तिला माझा मृत्यू हवा आहे; चिठ्ठी लिहीत पतीने उचललं टोकाचं पाऊल

बाबा, मला माफ करा… माझी बायको मला मारते आणि तिला माझा मृत्यू हवा आहे; चिठ्ठी लिहीत पतीने उचललं टोकाचं पाऊल

बंगळुरुमधील अतुल सुभाष हे प्रकरण ताजे असतानाच आता कर्नाटकात अशीच एक घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी चामुंडेश्वरी नगर येथे घडली आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या या व्यक्तीने पत्नीवर छळाचा आरोप करणारी चिठ्ठी सोडली आहे.

पेटारू गोल्लापल्ली असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पेटारू यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते. सततच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्य विभक्त राहू लागले आणि पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यात तब्बल वीस लाख रुपये पोटगीची मागणी करण्यात आली होती.

पेटारू याचा भाऊ एशय्या याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवार असल्याने घरातील सर्व चर्चमध्ये गेले होते आणि जेव्हा दुपारी घरी परतले त्यावेळी त्यांचा भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या शेजारी एक चिठ्ठी आढळली. त्यात त्याने आपल्या मृत्यूला पत्नी जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. बाबा, मला माफ करा, माझी बायको मला मारते आणि तिला माझा मृत्यू हवा आहे, असे त्या चिठ्ठीत लिहीले आहे.

एशय्याने आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. माझा भाऊ एका खासगी कंपनीत काम करत असे. मात्र तीन महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. त्याच्या पत्नीला अटक करून माझ्या भावाला न्याय द्यावा. त्याला जसा त्याला त्रास सहन करावा लागला, तसा त्रास इतर कुणालाही सहन करावा लागू नये. तिच्या मोठ्या भावानेही पेटारुला मारहाण केली होती. त्याबाबत पोलिसांत तक्रारही आहे. पोलिसांनी सांगितले की, पेटारुच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे, त्याच्या पत्नीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;