उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवादरम्यान लाकडी मचान कोसळले, 7 भाविक ठार तर 50हून अधिक जखमी

उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवादरम्यान लाकडी मचान कोसळले, 7 भाविक ठार तर 50हून अधिक जखमी

उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू महोत्सवादरम्यान लाकडी मचान कोसळून झालेल्या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये दोन महिलांसह सात पुरुषांचा समावेश आहे तर 50 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.

बागपतमधील भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू महोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी बरौत येथील श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या परिसरात 65 फूट उंच लाकडी मचान कोसळल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 50हून अधिक जण जखमी झाले. ही घटना 28 जानेवारीला सकाळी 8 वाजता घडली. त्यामुळे घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.दुर्घटनेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 6 ते 7 पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत.

अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पंकज वर्मा यांनी आतापर्यंत सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी मनीष कुमार यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. डीएम अस्मिता लाल आणि एसपी अर्पित विजयवर्गीय रुग्णालयांमध्ये पोहोचून जखमींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;