गुरमीत राम रहीम 12 व्यांदा पॅरोलवर सुटला, कडक सुरक्षेत तुरुंगातून गुपचूप बाहेर काढलं!

गुरमीत राम रहीम 12 व्यांदा पॅरोलवर सुटला, कडक सुरक्षेत तुरुंगातून गुपचूप बाहेर काढलं!

बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. हा 12 व्यांदा पॅरोलवर सुटला आहे. पॅरोल मिळाल्यानंतर मंगळवारी पहाटे 5 वाजून 26 मिनीटांनी त्याला गुपचूप बाहेर काढण्यात आले. तो सिरसा येथील आश्रमात राहणार असल्याचे बोलले जात आहे.

रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला राम रहीम गुरमीत सिंग याला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी राम रहीमच्या विश्वासातील सहकारी हनीप्रीत स्वतः दोन वाहनांसह डेरा प्रमुख राम रहीमला घेण्यासाठी आली होती. शिक्षा मंजूर झाल्यापासून पहिल्यांदाच सिरसा येथील आश्रमात राहण्याची त्याला परवानगी देण्यात आली आहे. 2017 साली शिक्षा सुनावल्यानंतर 8 वर्षे तो डेराच्या आश्रमात जाऊ शकला नाही. सिरसा येथील आश्रमात पोहोचल्यानंतर त्याने आपल्या अनुयायांना सिरसा धाम येथे न येण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी 2024 मध्येही राम रहीमने इमर्जन्सी पॅरोल मागितला होता. निवडणूक आयोगाने 30 सप्टेंबर रोजी तीन अटींसह त्यांचा पॅरोल मंजूर केला होता. राम रहीम हरयाणाला भेट देऊ शकत नाही किंवा सोशल मीडियावरील कोणत्याही निवडणूक कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही, अशी अट होती.

25 ऑगस्ट 2017 रोजी पंचकुलामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गुरमीत राम रहीमला सुनारिया तुरुंगात आणण्यात आले होते. दोन साध्वींचे लैंगीक शोषण केल्याप्रकरणी राम रहीमला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर गुरमीत राम रहीमला पत्रकार हत्या आणि डेरा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, पंजाब-हरयाणा न्यायालयाने रणजीत हत्या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;