लाडकी बहीण आणि कर्जमाफीसाठी मोदींच्या घरातून, अदानीच्या खिशातूनत किंवा गुजरातमधून पैसे आणा – संजय राऊत

लाडकी बहीण आणि कर्जमाफीसाठी मोदींच्या घरातून, अदानीच्या खिशातूनत किंवा गुजरातमधून पैसे आणा – संजय राऊत

लाडक्या बहिणीमुळे 45 हजार कोटींचा खड्डा पडला आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच लाडकी बहीण आणि कर्जमाफीसाठी मोदींच्या घरातून, अदानीच्या खिशातूनत किंवा गुजरातमधून पैसे आणा असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निती आयोग आणि या देशाची शिखर बँक यांनी जी माहिती दिली आहे त्यात स्पष्ट दिसतंय. की निवडणुकीपूर्वी मतं मिळवण्यासाठी ज्या रेवडी योजना आहेत त्यामुळे महाराष्ट्र कर्जाच्या खाईमध्ये ढकलंलं गेलं आहे. लाडक्या बहीणीमुळे 45 हजार कोटींचा खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे. भाजपने जाहीरनाम्यात कर्जमाफीचे वचन दिले आहे. आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसजी खोटं बोलू नका. एकनाथ शिंदे, अजित पवार यांची कर्जमाफी देण्याची भूमिका आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल. आणि लाडक्या बहीणींना 2100 रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे. त्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरून की अदानीच्या खिशातून की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचे. पण ज्या घोषणा तुम्ही केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;