Dombivli News – डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद, सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध; पोलीस ठाण्यात तक्रार

Dombivli News – डोंबिवलीतील सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद, सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध; पोलीस ठाण्यात तक्रार

कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय. डोंबिवली नांदीवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला मराठी कुटुंबीयांना विरोध तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केला. सोमवारी रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये येत्या 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला. काल रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की,” अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले”. याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. अमराठी कुटुंबीयांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला. मात्र, या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद उफाळून आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;