महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर हल्ला, दगडफेक आणि तोडफोडीने प्रवासी घाबरले

महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर हल्ला, दगडफेक आणि तोडफोडीने प्रवासी घाबरले

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झाशीहून प्रयागराज येथे महाकुंभसाठी जाणाऱ्या विशेष ट्रेनवर मध्य प्रदेशातील हरपालपूर रेल्वे स्थानकावर हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.  हल्लेखोरांनी यावेळी रेल्वेवर दगडफेक आणि ट्रेनची तोडफोडही केल्याचे वृत्त आहे .या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. झाशीहून प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या विशेष ट्रेनवर हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांनी यावेळी रेल्वेवर दगडफेक आणि ट्रेनची तोडफोडही केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण झाशी विभागातील हरपालपूर स्टेशनचे आहे. हल्ल्यादरम्यान रेल्वेच्या बोगीतून प्रवास करणारे प्रवासी घाबरले होते. यावेळी हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्याही तोडल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;