वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई

वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई

विदर्भात वाघांच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. याचदरम्यान वन विभागाने सोमवारी बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही कारवाई केली. बहेलिया टोळीने 2013 ते 2015 या कालावधीत विदर्भातील जवळपास 19 वाघांची शिकार केल्याचा आरोप आहे. अलीकडे झालेल्या वाघांच्या हत्येमागे अजित राजगोंडचा हात असण्याचा संशय आहे.

मागील महिनाभरात विदर्भात 11 वाघांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांची हत्या झाल्याचा संशय असतानाच वन विभागाने संशयितांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. बहेलिया टोळी मध्य प्रदेशातील आहे. 2013 ते 2015 या अवधीतील 19 वाघांच्या शिकारीमागे अजित राजगोंड व त्याचे भाऊ केरू व पुट्टू यांचा हात आहे. अजितला 2015 मध्ये वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने तिरुपतीमधून अटक केली होती. सीबीआयने त्या प्रकरणाचा अधिक तपास केला आणि अजितला शिक्षा झाली होती. सप्टेंबर 2024 मध्ये तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. गेल्या महिनाभरात झालेल्या वाघांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर वन विभाग त्याची अधिक चौकशी करणार आहे. या भागात अजित किती दिवसांपासून राहत आहे? त्याने वाघांची शिकार केली का? त्याच्या टोळीतील कितीजण या भागात वावरत आहेत, याची उकल करण्यासाठी वन विभागाचे विशेष पथक अजित राजगोंडची कसून चौकशी करीत आहे.

दोन बिबटय़ांना बर्ड फ्लूची लागण

चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील चारपैकी दोन बिबटय़ांची बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळ येथील प्राण्यांच्या प्रयोगशाळेकडून चाचणीचा अहवाल आला आहे. यापूर्वी चार गिधाडांची बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पात गिधाडांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळे तीन वाघ संक्रमित झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;