‘अरुंधती’ पुन्हा येतेय; ‘या’ खास मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेनं जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
सर्वांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा प्रेक्षकांची भेटीला येणार आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत सध्या स्विटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या खास एण्ट्रीबद्दल म्हणाली, "पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळतंय याचा अतिशय आनंद होतोय. साधारण दीड महिन्यापूर्वी आमच्या मालिकेनं निरोप घेतला होता."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List