सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस ‘या’ व्यक्तीच्या शोधात, खळबळजनक दावा

सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस ‘या’ व्यक्तीच्या शोधात, खळबळजनक दावा

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहे. हल्लामध्ये एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी शरीफुल इस्लामला अटक केली होती. ठाणे येथील आरोपीला अटक करण्यात आलं आहे. त्याचे वर्णन बांगलादेशचे नागरिक असं करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

सैफवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम उर्फ ​​विजय दास याला 19 जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली होती. त्याला 24 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

मुंबई पोलीस अधिकाऱ्याच्या खबरीने दिलेली धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी सैफवरील हल्ल्यात एकापेक्षा अधिक लोकांचा हात असल्याचा युक्तिवाद करून आरोपी शरीफुल इस्लामच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

आरोपी तपासात सहयोग करत नाही. हल्ल्यात वापरलेला चाकू स्वतः खरेदी केला होता का? या प्रश्नाचं उत्तर देखील आरोपीने अद्याप दिलेलं नाही. न्यायालयाने शरीफुलच्या पोलीस कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ केली होती. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर आरोपी शरीफुल काही दिवस कोलकात्यातही राहिला होता. अशा परिस्थितीत या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक 26 जानेवारीला पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे.

‘या’ व्यक्तीच्या शोधात पोलीस

सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस खुकमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्याच्यावर शरीफुलला सिमकार्ड पुरवल्याचा आरोप आहे. सध्या सर्वत्र सैफ अली खान प्रकरणाची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्याच्या कुटुंबात भीतीचं वातावरण असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सैफ अली खान याने 24 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेवर वक्तव्य केलं. अभिनेता म्हणाला, ‘आरोपीने 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि स्टाफवर हल्ला केला. मी जेव्हा त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने माझ्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोर चाकूने वार करून पळून गेला…’ याप्रकरणी जवळपास 50 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;