Burari Building Collapse – दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; 10 जणांना वाचवण्यात यश

Burari Building Collapse – दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; 10 जणांना वाचवण्यात यश

दिल्लीतील बुरारी भागात सोमवारी सायंकाळी चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी NDRF ची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यामध्ये 6 आणि 14 वर्षीय अशा दोन मुलींचा समावेश आहे.

कौशिक एन्क्लेव्हच्या ऑस्कर पब्लिक स्कूलजवळ हा अपघात झाला. आपचे राष्ट्रीय संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. “ही घटना अतिशय दुःखद आहे. बुरारी येथील आमचे आमदार संजीव झा यांना पक्ष कार्यकर्त्यांसोबत तात्काळ तेथे जाऊन प्रशासनाला मदत आणि बचाव कार्यात मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकांनीही कृपया शक्य ती सर्व मदत करा, असे त्यांनी ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;