हिंदुस्थानी जोडप्याला अमेरिकेने माघारी धाडले; ट्रम्प सरकारचे कठोर कायदे लागू

हिंदुस्थानी जोडप्याला अमेरिकेने माघारी धाडले; ट्रम्प सरकारचे कठोर कायदे लागू

अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने कठोर कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच याचा फटका हिंदुस्थानी दाम्पत्याला बसला आहे. परदेशातून अमेरिकेतून येणाऱ्या उपऱ्यांना आळा घालण्यासाठी ट्रम्प सरकारने कठोर कायदे करायला सुरुवात केली आहे.

न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळावर याचा प्रत्यय आला आहे. बी1 आणि बी2 व्हिजिटर व्हिसावर आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या हिंदुस्थानी जोडप्याने परतीचे तिकीट न दाखवल्याने अमेरिकन सरकारने या दाम्पत्याला विमानतळावरच रोखले. अमेरिकेत प्रवेश करू दिला नाही. या जोडप्याकडे हिंदुस्थानात परत कधी परतणार याचे तिकीट नव्हते. त्यामुळे अमेरिकन प्रशासनाने या जोडप्याला विमानतळावरूनच माघारी धाडले. अमेरिकेत 2025 च्या इमिग्रेशन नियमांत झालेल्या बदलाचा हवाला देत विमान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या जोडप्याला अमेरिकेत प्रवेश करू दिला नाही. अमेरिकेत व्हिजिटर व्हिसावर येणाऱ्यांकडे त्यांचे रिटर्न तिकीट दाखवणे बंधनकारक आहे.

प्रवाशांमध्ये चिंता

अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.  अमेरिकेच्या नव्या कायद्यामुळे अमेरिकेत येणाऱ्यांची चिंता वाढली आहे. रिटर्न तिकीट नसेल तर अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याची माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही रिटर्न तिकीट काढले नाही, असे या जोडप्याचे म्हणणे आहे. इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे, तर नव्या इमिग्रेशन नियमांसाठी सरकारी वेबसाईट आणि ट्रव्हल एजन्सीकडून प्रवाशांनी माहिती घ्यावी, असे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;