गोष्ट एका लग्नाची! हिंदुस्थानचा नवरदेव,ग्रीसची नवरी; महाकुंभमेळय़ात परदेशी तरुणीने बांधली लग्नगाठ

गोष्ट एका लग्नाची! हिंदुस्थानचा नवरदेव,ग्रीसची नवरी; महाकुंभमेळय़ात परदेशी तरुणीने बांधली लग्नगाठ

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ग्रीस देशातील तरुणीने हिंदुस्थानातील तरुणासोबत लग्नगाठ बांधली. या तरुणीचे नाव पेनेलोप असून तरुणाचे नाव सिद्धार्थ शिव खन्ना आहे. या दोघांनी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह केला. या लग्न सोहळ्याला साधू-संतांसोबत अनेकांची उपस्थिती होती. जुना आखाडय़ाचे महामंडलेश्वर यतींद्रानंद गिरी यांनी कन्यादान केले.

सनातन धर्म हा आनंदी जीवन जगण्याचा आणि जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे लग्नानंतर पेनेलोप हिने म्हटले आहे. पेनेलोप हिने अथेन्समधील एका प्रसिद्ध विद्यापीठातून टुरिझम मॅनेजमेंटमध्ये पदवी पूर्ण केलीय, तर सिद्धार्थ हा योगगुरू आहे. सिद्धार्थ हा वेगवेगळ्या देशांत जाऊन योगा शिकवतो. तो नवी दिल्लीच्या पश्चिम पंजाबी बाग येथे राहतो. लग्न झाल्यानंतर व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. माझे लग्न वैदिक शास्त्रानुसार आध्यात्मिक पद्धतीने झालेय. हे सगळे अद्भुत असे आहे. मी प्रचंड आनंदी झाले आहे, असे पेनेलोप हिने म्हटलेय, तर सिद्धार्थने पेनेलोपला लग्न कुठे हिंदुस्थानात की ग्रीसला करायचे असे विचारले होते, परंतु पेनेलोपने हिंदुस्थान निवडले.

सर्व काही अविश्वसनीय

सध्या लग्नात दारू पिण्याचा प्रकार प्रचंड वाढला आहे, परंतु आमचे लग्न एक वेगळ्या पद्धतीने आणि दिव्य, आध्यात्मिक पद्धतीने झालेय. मी याआधी कधीच कोणत्याही हिंदुस्थानी लग्नात सहभागी झाले नाही, परंतु माझे लग्न हिंदुस्थानी पद्धतीने झालेय याचा मला प्रचंड आनंद झालाय. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. या ठिकाणी लग्न केले हे खरोखर अविश्वसनीय आहे, असे पेनोलोप म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;