अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून खुले
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत हे उद्यान खुले असणार असून यासाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. हे उद्यान सोमवार वगळता सर्व दिवसांसाठी नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उद्यान पाहता येईल.
हे उद्यान जानेवारी आणि ऑगस्ट असे दोन वेळा जनतेसाठी खुले केले जाते. राष्ट्रपती भवनातील गेट नंबर 35 वरून एण्ट्री दिली जाते. जास्तीत जास्त लोकांना हे उद्यान पाहता यावे यासाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट नंबर 35 पर्यंत दर 30 मिनिटाला बस चालवली जाते. हे उद्यान पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. फक्त या ठिकाणी येण्याआधी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर फ्री टोकन मिळते. याची बुकिंग सुरू करण्यात आली असून visitrashtrapatibhavan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List