सुनीता विल्यम्स गुरुवारी अंतराळ स्थानकाबाहेर येणार!

सुनीता विल्यम्स गुरुवारी अंतराळ स्थानकाबाहेर येणार!

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागील सात महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. अंतराळ स्थानकात त्या सुखरूप असून त्यांची कामे सुरू आहेत. 16 जानेवारी रोजी त्यांनी स्पेसवॉक केला. त्यानंतर आता 30 जानेवारी रोजी त्या पुन्हा अंतराळ स्थानकाबाहेर जाणार आहेत. त्यांच्यासोबत फ्लाइट इंजिनीअर बुच विल्मोर असतील. दोघे मिळून अंतराळ स्थानकाबाहेर सुमारे साडेसहा तास काम करतील.

या मोहिमेत दोघे रेडियो फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना काढून टाकतील. तसेच स्थानकाच्या बाहेर सूक्ष्मजीवांचा शोध घेतील. नासाच्या माहितीनुसार, अंतराळ स्थानकात दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या या दोघांची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2025 मध्ये ते पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. अंतराळ स्थानकाबाहेर येण्यापूर्वी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी क्वेस्ट एअर लॉकमध्ये त्यांच्या मोहिमेची चांगली तयारी केली. स्पेससूट हेल्मेटची देखभाल आणि सेफर या उपकरणांची तपासणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;