लक्षवेधक – शेअर बाजारात पडझड कायम!

लक्षवेधक – शेअर बाजारात पडझड कायम!

सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. मागील आठवडय़ात शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली होती. ती आज कायम दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 824 अंकांनी घसरून 75,366 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 263 अंकांनी घसरून 22,829 अंकांवर बंद झाला. बीएसईवर लिस्टेड पंपन्यांचे बाजार मूल्य 9.43 कोटी रुपयांनी कमी होऊन 410.08 लाख कोटींवर आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचे एका झटक्यात 8 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष आता पेंद्रीय अर्थसंकल्प 2025 कडे लागले आहे.

कपडेबुटांसाठी खरेदी केला 3बीएचके फ्लॅट

अभिनेता गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने आपले कपडे आणि बूट ठेवण्यासाठी 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट केवळ कपडे आणि बुटांसाठी खरेदी केल्याचा दावा कृष्णाने एका कार्यक्रमात केला. दर सहा महिन्यांनी घरातील कपडे आणि बुटाचे कलेक्शन अपडेट करत असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.

श्रीराम कृष्णन अमेरिकेत एआय सल्लागारपदी

हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी एआय वरिष्ठ सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. श्रीराम हे व्हाईट हाऊसचे एआय आणि क्रिप्टो झार डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी कृतिम बुद्धिमता धोरण तयार करणे आणि समन्वय साधणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.

ये जवानी है दिवानी… 11 वर्षांनंतरही रेकॉर्ड

अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा 11 वर्षांपूर्वीचा  सिनेमा अलीकडे पुन्हा प्रदर्शित झाला. इतक्या वर्षांनंतरही या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2013 मध्ये ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाने वर्ल्डवाईड
बॉक्स ऑफिसवर 318 कोटींची कमाई केली होती. 11 वर्षांनंतर या सिनेमाने 25 कोटी कमावले आहेत.

गुजरातमधील मिस्त्रीला 1.96 कोटींची नोटीस

अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका मिस्त्रीला बंगळुरू जीएसटी विभागाने 1.96 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस पाठवली आहे. हा मिस्त्री केवळ महिन्याला 16 ते 17 हजार रुपये कमवतोय. जीएसटी विभागाने पाठवलेल्या नोटीसमुळे या मिस्त्रीचे धाबे दणाणले आहेत. सुनील सथवारा हा एक साधारण मिस्त्री आहे. छोटे-मोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;