महाकुंभमेळय़ाचा प्रवास महागला; प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे भाडे 50 हजार

महाकुंभमेळय़ाचा प्रवास महागला; प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे भाडे 50 हजार

महाकुंभमेळ्याचा विमान प्रवास महागलाय. प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे भाडे 50 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.  महाकुंभमेळ्याची जगभरात चर्चा आहे. गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या पवित्र संगमात स्नानाचे अनोखे महत्त्व आहे. 45 दिवसांत संगमात स्नान करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. ही संख्या 40 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमान मार्ग फुलून गेले आहेत. विमानाचे दर गगनाला भिडले असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने विमान कंपन्यांना तिकिटासाठी योग्य दर आकारण्याचा आणि विमान फेऱ्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरी उड्डाण महासंचालनालयाने जानेवारी महिन्यासाठी 81 अतिरिक्त विमानांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशभरातून प्रयागराजसाठी एकूण 132 उड्डाणांपर्यंतची कनेक्टिविटी वाढली आहे. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानाच्या दिवशी फ्लाईट तिकिट सर्वाधिक दराने विकली जात आहे. महाकुंभमेळ्यात 29 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी यासारख्या दिवशी दिल्ली, मुंबईहून प्रयागराजला येणाऱ्या विमानाचे तिकीट दर गगनाला भिडलेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;