माऊंट एव्हरेस्टसाठी मोजा लाखो रुपये
माऊंट एव्हरेस्ट म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर. या शिखरावर चढाई करण्यासाठी दरवर्षी जगभरातून हजारो गिर्यारोहक येतात. यापुढे एव्हरेस्ट चढण्यासाठी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. नेपाळ सरकारने एव्हरेस्ट चढण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांचे शुल्क वाढवले आहे. विदेशी गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढण्यासाठीचे शुल्क 11 हजार अमेरिकन डॉलरवरून 15 हजार अमेरिकन डॉलर करण्यात आले आहे.
देशी चलनात सांगायचे तर 9.48 लाख रुपयांवरून 12.35 लाख रुपये शुल्क वाढ करण्यात आली. माऊंट एव्हरेस्ट चढण्याचे दर ऋतूनुसार बदलतात. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान गिर्यारोहण शुल्कात सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली. डिसेंबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्टदरम्यान फीमध्ये 80 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. नेपाळी गिर्यारोहकांच्या परमिट शुल्कातदेखील वाढ होत आहे. शरद ऋतूत एव्हरेस्टवर चढाई करू इच्छिणाऱ्या गिर्यारोहकांना 75 हजार रुपयांऐवजी दीड लाख रुपये मोजावे लागतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List