राजकोटवरही राज्य गाजवण्यासाठी सज्ज, आज इंग्लंडविरुद्ध तिसरी टी-20

राजकोटवरही राज्य गाजवण्यासाठी सज्ज, आज इंग्लंडविरुद्ध तिसरी टी-20

कोलकाता आणि चेन्नई जिंकल्यानंतर आता हिंदुस्थानी संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेण्यासाठी राजकोटवर उतरणार आहे. पहिल्या दोन्ही लढतींप्रमाणे राजकोटवर राज्य मिळवण्यासाठी हिंदुस्थान आपले पहिल्या दोन सामन्यांत आजमावलेले फिरकीअस्त्र घेऊनच उतरणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला पहिल्या दोन्ही सामन्यांत सूर गवसला नसला तरी त्याच्या नेतृत्वाने हिंदुस्थानी संघाला सलग दोन विजय मिळवून दिले आहेत. या दोन्ही सामन्यांत फिरकीअस्त्र फार प्रभावी ठरले आहे आणि तिसऱया सामन्यातही दोन वेगवान गोलंदाजांसह हिंदुस्थानी ताफा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. कोलकात्यात वरुण चक्रवर्थी आणि अक्षर पटेलच्या फिरकीने कमाल केली होती, तर चेन्नईतही याच दोघांनी इंग्लिश फलंदाजांच्या फटक्यांना वेसण घालण्यात यश मिळवले होते. त्यामुळे राजकोटच्या खेळपट्टीवरही हिंदुस्थान वेगळा प्रयोग करण्याची शक्यता नाही. परिणामतः मोहम्मद शमीच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम मानली जात आहे.

एकच लक्ष्य मालिका विजय
हिंदुस्थान आपली विजयी लय कायम राखण्यासाठी तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजांसह उतरणार हे निश्चित आहे. राजकोट जिंकून मालिकेतील थरार कमी करणे हेच हिंदुस्थानचे एकमेव लक्ष्य उरले आहे. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवल्यावर हिंदुस्थानी संघ उर्वरित दोन्ही लढतींत आपले अन्य प्रयोग करण्यासाठी मोकळा होऊ शकतो. त्यामुळे राजकोटमध्ये मालिका जिंकून पुणे गाठण्याचे ध्येय हिंदुस्थानसमोर आहे. असे असले तरी हिंदुस्थानसाठी दुसऱया सामन्यात दिग्गज फलंदाजांचे अपयश फार घातक ठरू शकते. गेल्या दोन सामन्यांतील कामगिरी पाहता पहिला सामना अभिषेकने स्वतःच्या झंझावाताने जिंकून दिला होता, तर दुसऱया सामन्यात एकटय़ा तिलक वर्माची बॅट तळपली होती. मालिका जिंकण्यासाठी अन्य फलंदाजांनाही आपल्या बॅटची कमाल दाखवावी लागणार आहे.

इंग्लंडला विजय हवाच
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चेन्नईत इंग्लंडने शर्थीचे प्रयत्न केले होते. जे तिलक वर्माने हाणून पाडले. त्यामुळे राजकोटवर इंग्लंडला विजयाशिवाय पर्याय उरलेला नाही. सलग तिसरा पराभव त्यांच्यासाठी मालिका गमावणारा ठरू शकतो. त्यामुळे जोस बटलर हिंदुस्थानचा विजयरथ राजकोटवर रोखण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहे. त्यासाठी संघात काही बदलांसह इंग्लिश खेळाडू मैदानात उतरून आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंड ज्या पद्धतीने सराव करत होते, त्यावरून ते फक्त करो या मरो याच मानसिकतेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;