उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रोहिंग्ये आणि बांगलादेशींच्या घुसखोरीचे पडसाद

उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रोहिंग्ये आणि बांगलादेशींच्या घुसखोरीचे पडसाद

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत रोहिंगे आणि बांगलादेशींच्या मुंबईतील घुसखोरीचे पडसाद उमटले. तर आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवत उपनगरातील झोपडपट्टी सुधारणांसाठी 253 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला.

पश्चिम उपनगरातील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार, सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पालिका आयुक्त भूषण गगराणी, खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिह्यातील झोपडपट्टी परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी ‘नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा’ या योजनेंतर्गत 253 कोटी 90 लाख इतकी वाढीव मागणी प्रस्तावित करण्याचा निर्णय या  बैठकीत घेण्यात आला. वाढत्या घुसखोरीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्ये यांची जिह्यात मोठय़ा प्रमाणावर होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे आणि याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एसआरएच्या इमारतींतील अवैध घुसखोरीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

पर्यटन विकासासाठी 30 कोटी

उपनगर जिह्यातील जिह्यात मत्स्यव्यवसायाशी निगडीत प्रमुख 13 बंदरे असून या बंदरांच्या ठिकाणी जिह्यातील मच्छीमार बांधवांकरिता मासळी सुकविण्याचे ओटे, जेट्टी, प्रसाधनगृहे, जोडरस्ते इ. आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘लहान मासेमारी बंदरे’ या योजनेंतर्गत  34 कोटी रुपयांची वाढीव मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याशिवाय येथील  उपनगरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधांची आवश्यकता आहे. यासाठी ‘पर्यटन विकास’ या योजनेंतर्गत  30 कोटी रुपयांची इतकी वाढीव मागणी प्रस्तावित करण्यात आली.

‘सेव्हन हिल्स’च्या कामगिरीचे कौतुक

शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या बैठकीत दोन महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. कोरोना काळात सेव्हन हिल्स हॉस्पिटलने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे त्यांनी कौतुक केले मुंबईकरांना परवडणारी आरोग्य सेवा देऊन या हॉस्पिटलने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. भविष्यात हॉस्पिटलचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि मुंबईकरांना परवडणाऱया दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनसोबत संयुक्त उपक्रमाचा प्रस्ताव दिला.

डम्पिंग ग्राउंडवर हॉस्पिटल

मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडची 45 एकर जमीन सध्या पडीक आहे. ही जागा रिलायन्स फाऊंडेशन, फोर्टिस, लीलावती, शंकर नेत्रालय किंवा अशा कोणत्याही मोठय़ा वैद्यकीय संस्थेला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, नेत्रविकारांवरील उपचारांसाठी किंवा कर्करोगाच्या उपचारांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची सूचनाही मिलिंद नार्वेकर यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;