Ayodhya Ram Temple अयोध्येत तुफान गर्दी; दोन भाविकांचा मृत्यू

Ayodhya Ram Temple अयोध्येत तुफान गर्दी; दोन भाविकांचा मृत्यू

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमधून रोज हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. गेल्या 30 तासांत तब्बल 25 लाखांहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. आज सुमारे 10 लाख भाविक अयोध्येत आल्याचा अंदाज स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला. भाविकांची गर्दी वाढतच गेल्याने दोन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चेंगराचेंगरीमुळे दोन भाविकांना जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. परंतु, पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.

मृत भाविकांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दोघांचेही वय अंदाजे 60 सांगितले जात असून दोघेही हरयाणाचे रहिवासी आहेत. दोघांचा मृत्यू कार्डियाक अॅरेस्टमुळे झाल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी म्हटले आहे. मौनी अमावस्येच्या काळात संगमावर डुबकी लगावणे पवित्र मानले जात असल्याने देशभरातून लाखो भाविक महाकुंभमध्ये दाखल झाले. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने रेल्वे प्रशासनाला काही ट्रेन रद्द कराव्या लागल्या. यामुळे महाकुंभहून परतणारे भाविक अयोध्येकडे वळल्याचे समोर आले. दरम्यान, भाविकांची गर्दी वाढतच गेल्यामुळे अयोध्येतील सर्व रस्ते बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रुग्णालयात नेण्यासाठी 45 मिनिटे

भर गर्दीत एक पुरुष आणि एका महिलेला चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. प्रचंड गर्दी असल्याने 500 मीटरवर असलेल्या रुग्णालयात दोघांना नेण्यासाठी तब्बल 45 मिनिटे लागली. त्यातच सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने रुग्णांना तत्काळ बाहेर काढणे कठीण झाले. दरम्यान,एखाद्या भाविकाला आरोग्याची समस्या उद्भवल्यास वैद्यकीय कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे.

महामार्गावर वाहनांच्या रांगा; पार्किंग व्यवस्था अक्षरशः कोलमडून

भाविकांची गर्दी वाढतच गेल्याने महामार्ग आणि रामपथाच्या बाहेरील भागात राहणारे लोक महत्वाच्या कामासाठी शहरात येऊ शकत नाहीत. वाहनांच्या आगमनामुळे पोलिस आणि प्रशासनाची पार्ंकग व्यवस्था अक्षरशः कोलमडून गेली आहे. उड्डाणपुला पासून चुडामणी चौक आणि महोबारा महामार्गापर्यंत दोन्ही ट्रकवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

सुरक्षा जवान तैनात

गर्दीवर नियंत्रणासाठी सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येत येणाऱया सर्व रस्त्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. बुधवारी पौष अमावस्या आहे. या काळात आणखी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;