घाण करणाऱ्या मुंबईकरांना 4 कोटी 20 लाखांचा दंड!

घाण करणाऱ्या मुंबईकरांना 4 कोटी 20 लाखांचा दंड!

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर अस्वच्छता करणारे, थुंकणारे आणि कचरा करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलकडून धडक कारवाई सुरू असून गेल्या दहा महिन्यांत तब्बल 1 लाख 45 हजार 438 जणांना दणका देण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 4 कोटी 20 लाख 2 हजार 612 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पालिकेने सर्व 24 वॉर्डात 30 क्लीनअप मार्शलची नेमणूक केली आहे. महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाइन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीनअप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीनअप मार्शल संस्थेच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका, तर अर्धी रक्कम पंत्राटदाराला मिळत आहे. हा दंड टाळण्यासाठी मुंबईकरांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;