वाल्मीक कराड व पोलीस अधिक्षकांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेच्या गँगवर मकोका

वाल्मीक कराड व पोलीस अधिक्षकांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेच्या गँगवर मकोका

डिसेंबर महिन्यात बीडमध्ये गोळीबार केलेल्या सनी आठवलेच्या आठवले गँगवर देखील बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. या गँगरवर पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याचेही आरोप आहेत. गेल्या महिनाभरातील बीड पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. याआदी पोलिसांनी सुदर्शन घुले या वाल्मीक कराडच्या निकटवर्तीयाच्या गँगवर देखील मकोका लावला होता.

13 डिसेंबर 2024 रोजी बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ येथे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई या सहा आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या आरोपींवर आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची माहिती मिळते.

काही दिवसांपूर्वी सनी आठवलेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून एक मोठी पोस्ट शेअर करत त्यात एक ऑडिओ क्लिप टाकलेली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचे संभाषण होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;