Jasprit Bumrah – टीम इंडियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा मोठा सन्मान, ठरला 2024 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू

Jasprit Bumrah – टीम इंडियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा मोठा सन्मान, ठरला 2024 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू

टीम इंडियाचा वेगवान आणि सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहची आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2024 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू (ICC Men’s Test Cricketer of the Year) म्हणून निवड केली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

जसप्रीत बुमराहने 2024 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला होता. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर करंडकातही त्याने जबरदस्त गोलंदाजी करत 32 कंगारूंच्या दांड्या गुल केल्या होत्या. तसेच बुमराहने 2024 या वर्षामध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये 14.92 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या धमाकेदार कामगिरीमुळेच त्याची 2024 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून ICC ने निवड केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान मिळवणारा जसप्रीत बुमराह सहावा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रवीड (2004), गौतम गंभीर (2009), विरेंद्र सेहवाग (2010), रविचंद्रन अश्विन (2010), रविचंद्रन (2016) आणि विराट कोहली (2018) यांनी हा सन्मान मिळवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;