शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीत सुधारणेची माहिती

शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट; सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीत सुधारणेची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छामुळे कालच्यापेक्षा आज पवारसाहेबांची तब्येत खूप बरी आहे. डॉक्टरांनी त्यांना तीन-चार दिवस आराम करायला सांगितला आहे. त्यांना घरी राहणं फारसं प्रिय नाही. त्यामुळे उद्धजी अनेक वेळा चिडवतात की, तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करत असतात. कालच उद्धवजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं चार दिवस आता त्यांना (शरद पवारसाहेब) घरात बांधून ठेवाच म्हणाले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

आता पवारसाहेबांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना चेस्ट कन्जेशन आणि खोकला झाला आहे. तरीही ते दौरे करत होते. मुंबईत ते आहेत. काल त्यांच्या चाचण्याही केल्या. सर्वांच्या शुभेच्छांमुळे त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. खूप लोकांनी शुभेच्छांसाठी फोन केले. आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. पण दौरे रद्द झाल्याने बाहेर सगळ्यांना कळलं. लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;