ऊसतोडणीसाठी गेलेल्या महिलांवर काळाचा घाला, कारची रिक्षाला धडक; दोघींचा मृत्यू तर 15 जखमी

ऊसतोडणीसाठी गेलेल्या महिलांवर काळाचा घाला, कारची रिक्षाला धडक; दोघींचा मृत्यू तर 15 जखमी

ऊसतोडणी करून घरी परतत असताना महिलांच्या रिक्षाला कारने धडक दिल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 15 महिला जखमी झाल्या आहेत. चंद्रपुरमधील वरोरा तालुक्यातील येन्सा येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील मजूर महिला रामपूर येथे ऊसतोडणीसाठी गेल्या होत्या. ऊसतोडणीचं काम झाल्यानंतर सायंकाळी रिक्षाने सर्वजणी घरी परतत होत्या. यावेळी येन्सा गावाजवळ बौद्ध भिक्षुकांच्या कारने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की यात रंजना झुंजूरकर आणि सविता बुरटकर या महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 जणी जखमी झाल्या. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;