ST Bus Fare Hike – एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभरात मंगळवारी ‘चक्का जाम’ अंदोलन

ST Bus Fare Hike – एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभरात मंगळवारी ‘चक्का जाम’ अंदोलन

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामन्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये राज्यातील महायुती सरकारने भरमसाठ वाढ केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ केली आहे. याच विरोधात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘चक्का जाम’ अंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मंगळवारी (28 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता राज्यभरातील जिल्ह्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ होणार आहे.

एसटी भाडेवाढ लागू, मात्र बेजबाबदार परिवहन मंत्र्यांना कल्पनाही नाही

महायुती सरकारने राज्यात एसटी बसच्या तिकीट दरामध्ये वाढ केली, मात्र बेजबाबदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना याची कल्पनाही नव्हती. धाराशिव येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, भाडेवाडीबद्दल अजित पवार यांना माहित नव्हतं का? यावर सरनाईक म्हणाले की, ”मलाही माहित नव्हतं. मलाही आश्चर्य वाटलं. मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं इतकी मोठी दरवाढ करताय आणि आपल्याला काही माहित नाही. आम्हाला जेव्हा पत्रकारांचे फोन आले तेव्हा कळलं. मग आम्ही सचिवांशी बोललो, त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण काल मंजूर केला आणि 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;